राजकीय घडामोडींना वेग आला असताना अजित पवार घेणार CM शिंदे अन् फडणवीसांची भेट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अजित पवार 7 आमदारांसह नॉट रीचेबल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली. राज्याचा सत्तासंघर्षावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे. यादरम्यान राज्यात राजकीय उलथापालथ होणार अशी चर्चा सुरू असताना दामानिया यांचं ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे.त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली आहेत. या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारणही समोर आलं आहे.



अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं आडवी झाली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार असून अजित पवार विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने आणि गरपिठीने धुमाकूळ घातला असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, द्राक्ष, आंबा संत्रा या फळबागांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजपाला पिकांचेही मोठे नुकसान यामध्ये झाले होते. या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी यासाठी अजित पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने