अमिषा पटेलला होऊ शकते अटक..फसवणूकीच्या केसमध्ये कोर्टानं जारी केलं वॉरंट..

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात फसवूण केल्याप्रकरणी कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे. रांची येथील सिव्हिल कोर्टानं अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल याला चेक बाऊंस प्रकरणात हे वॉरंट जारी केलं आहे.माहितीसाठी इथं नमूद करतो की हे प्रकरण अडीच करोडची फसवणूक केल्या संबंधित आहे. 2018 साली 'गदर' अभिनेत्री अमिषा पटेल वर 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज' चा निर्माता अजय सिंगनं ही केस केली होती. त्यानं आरोप केला होता की अमिषा पटेलनं म्युझिक व्हिडीओ बनवू असं सांगून पैसे घेतले होते पण ना म्युझिक व्हिडीओ बनला ना निर्मात्याचे पैसे अमिषा पटेलनं परत दिले.



इंडिया टुडे रिपोर्टनुसार, आता रांचीच्या कोर्टानं अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट जारी केलं आहे. सोबत कोर्टानं नाराजगी जाहीर करत म्हटलं की अभिनेत्रीच्या विरोधात समन्स देखील जारी कले आहे पण असं असताना ना अमिषा कोर्टासमोर हजर झाली ना तिचा वकील.या प्रकरणात आता पुढील सुनावणी 15 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.निर्माता आणि तक्रारकर्ता अजय सिंग यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यानं अमिषा पटेलसोबत अॅग्रीमेंट केलं होतं. या अॅग्रीमेंटमध्ये नमूद केल्यानुसार एका म्युझिक व्हिडीओवर काम होणार होतं.

याच्यात स्पष्ट लिहिलं होतं की अमिषाला हे पैसे जून 2018 पर्यंत व्याजासकट परत करायचे आहेत. पुन्हा पुन्हा अभिनेत्रीकडे पैशासाठी विचारणा केल्यानंतर अमिषानं अडीच कोटींचा चेक निर्मात्याला दिला होता. जो बाऊन्स झाला.तसंच, अजय सिंगन अमिषा पटेल हिचा बिझनेस पार्टनर कुणाल गूमर याच्यावर धमकावण्याचा आरोप देखील केला आहे.सध्या अमिषा पटेल तिच्या 'गदर 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. ती पुन्हा एकदा सनी देओलच्या 'गरदर 2' सिनेमात त्याची सकिना म्हणून दिसणार आहे. सिनेमाचं प्रमोशन एकदम जोरदार सुरू झालं आहे. प्रमोशनसाठी स्टार्सनी आतापासून कंबर कसली आहे. यावर्षीच सिनेमा रिलीज होणार आहे,या सिनेमाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने