अमिताभसाठी संजीवनी ठरला होता केबीसी शो.. मात्र बिग बी यांनी शो करु नये असं जया बच्चनना वाटत होतं..

मुंबई: साली जेव्हा अमिताभ बच्चन यांनी टी.व्हीवरचा प्रसिद्ध क्वीझ शो 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करण्यास सुरुवात केली तेव्हा ते एक सुपरस्टार होते ,ज्यांनी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी मोठं पाऊल उचललं होतं. कितीतरी लोकांना वाटलं की अमिताभ यांचा हा निर्णय चुकीचा आहे. पण त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासाठी तो शो म्हणजे चॉइस नव्हती..तर त्यांची गरज होती.अमिताभ यांच्या अनेक जवळच्या लोकांनी त्यांना हा शो करण्यास नकार दिला..त्यामध्ये त्यांची पत्नी जया बच्चन या देखील सामिल होत्या. 



अमिताभ बच्चन यांना 'कौन बनेगा करोडपती' या शो चा चेहरा मानलं जातं. इतरही अनेक स्टार्सनी हा शो होस्ट करण्याचा प्रयत्न करुन पाहिला पण अमिताभ सारखी छाप कोणीच सोडू शकलं नाही. अशामध्ये जर तुम्हाला कळेल की अमिताभ यांची तेव्हा ती गरज होती अन्यथा त्यांनी हा शो केला नसता. कारण जया बच्चन यांना मुळीच वाटत नव्हते की अमिताभनी केबीसी शो होस्ट करावा..तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल आणि यामागचं कारण काय असू शकतं..याचे अनेक तर्क आपण लावाल.२००८ मध्ये अबु जानी आणि संदीप खोसला यांना दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांना केबीसी विषयी प्रश्न विचारला गेला होता की,'या शो नं रातोरात अमिताभ बच्चन यांचे नशीब कसे बदलवले..'.

हैराण झालेल्या जया बच्चन उत्तर देत म्हणाल्या,'तुम्ही हा विचार करू शकत नाही की मी तेव्हा सुरवातीला नकार दिला होता. मला तर वाटत नव्हतं की त्यांनी हा शो करावा'. जेव्हा जया बच्चन यांना याचे कारण विचारले तेव्हा म्हणाल्या,'मला फक्त वाटत होतं की हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी योग्य नाही. ते खूप मोठे सुपरस्टार आहेत,मोठ्या पडद्यावर त्यांनी काम केले आहे,तर छोट्या पडद्यावर काम करणं त्यांच्यासाठी योग्य नाही. पण या शो मधून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली'.२०२१ मध्ये जेव्हा अमिताभ बच्चननी १००० वा एपिसोड शूट केला होता,तेव्हा ते खूप भावूक झाले होते. त्यांनी म्हटलं होतं की-''जवळ-जवळ २१ वर्ष झाली. २००० साली या प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यावेळी मला माहित नव्हतं..सगळे लोक म्हणत होते..तुम्ही टेलीव्हिजन करताय,मोठ्या पडद्यावरनं छोट्या पडद्यावर येताय..तुमच्या इमेजला नुकसान पोहोचेल. पण त्यावेळी वेळ अशी होती की सिनेमात काम मिळत नव्हतं. पण पहिला भाग शो चा प्रसारित झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या रिअॅक्शन मिळाल्या त्या पाहून वाटलं की जणू जग मुठीत आलंय''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने