शिंदे गटाचा सुपडा साफ! पालघर बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

मुंबई: राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होत आहेत.यातच महाविकास आघाडीने शिंदे गटाला चांगलाच धोबापछाड दिला आहे. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा रोवला. 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने शिंदे गटाला धक्का दिला आहे.

पालघर बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला साधं खात ही उघडता आलं नाही. या निवडणुकीत १५ जागा महाविकास आघाडीच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.या निवडणुकीत दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आल्याने एकूण सदस्य संख्या १७ झाली. पालघर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.



खेड बाजार समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा 

पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.शनिवारी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३८९६ मतदारांपैकी ३८३९ मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी राष्ट्रवादी विरूद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. तरी देखील या निवडणुकीत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे.

राहुरी कृषी उत्पन्ना बाजार समितीवर तनपुरेंच वर्चस्व

अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या राहुरी कृषी उत्पन्ना बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले आणि यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.अखेर या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनेलने भाजप पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवत भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला आहे. तनपुरे गटाने 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवत राहुरी बाजार समितीवर 20 वर्षांपासूनची एकहाती सत्ता कायम ठेवली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने