पुरस्कार मिळाला नाही म्हणून तावातावानं परफॉर्म न करताच निघून चाललेला भाईजान.. पण तितक्यात..

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असलेला पहायला मिळतो. सलमान खानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता सध्या फिल्मफेअर 2023 च्या पत्रकार परिषदेतले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. या पत्रकार परिषदेत सलमाननं अॅवॉर्ड शो संबंधित एक किस्सा शेअर केला,जेव्हा त्याला बेस्ट अॅक्टरची ट्रॉफी मिळणार होती. पण असं झालं नाहूी आणि त्यानं अॅवॉर्ड शो मध्ये परफॉर्म करण्यास नकार दिला होता. 

तो किस्सा शेअर करताना सलमान खान म्हणाला,''मला सांगितलं गेलं होतं की मला फिल्मफेअर अॅवॉर्ड शो मध्ये यायचं आहे आणि मला बेस्ट अॅक्टर पुरस्कारानं सम्मानित करण्यात येईल. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन सोहळ्यात पोहोचलो होतो''.'' माझ्या वडीलांनी छान सूट घातला होता. त्यानंतर नॉमिनेशन्स सांगितले गेले आणि बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार जॅकी श्रॉफला मिळाला. त्यावर वडील म्हणाले,हे काय आहे?''''त्या रात्री मी सोहळ्यात परफॉर्म देखील करणार होतो,मी बॅकस्टेजला गेलो आणि सांगितलं की मी परफॉर्म करणार नाही. मला काही फरक नाही पडत यानं''.



सलमान तेव्हा म्हणाला, तो अॅवॉर्ड जॅकी श्रॉफला मिळालाय. नो डाऊट..त्यानं 'परिंदा' मध्ये कमाल काम केलंय,पण तुम्हा लोकांना माझ्यासोबत असं करायला नको हवं होतं. तुम्ही माझ्या वडीलांचे मित्र आहात मग तर तुम्ही माझ्याशी असं अजिबात वागायला नको हवं होतं''.त्यावर समोरुन मला म्हटलं गेलं की,''मला परफॉर्म करावं लागेल. पण मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मला परफॉर्मन्ससाठी पैसे देण्याची गोष्ट बोलली गेली''.

मी विचारलं,''किती द्याल?''

तर त्यांनी मला एक किंमत सांगितली.

सलमान खान पुढे म्हणाला,''ती किंमत ऐकल्यावरही मी काही तयार होत नव्हतो तेव्हा त्यांनी त्या किंमतीच्या पाच पट पैसे देऊ केले गेले. आणि म्हटलं गेलं,'प्लीज..कुणाला सांगू नको'.

तर मी म्हणालो,''तुम्ही चुकीच्या माणसाला हे सांगताय''.

माझं हे उत्तर ऐकून ते जोरजोरात हसू लागले.

माहितीसाठी इथं सांगतो की १९९० मध्ये जॅकी श्रॉफला 'परिंदा' सिनेमासाठी बेस्ट अॅक्टरचं फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळालं होतं. तेव्हा 'मैने प्यार किया' साठी सलमान खानचे नाव देखील चर्चेत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने