वयाच्या १५ व्या वर्षीच देणार ‘बीए’ ची परीक्षा

इंदूर: साधारणत १५-१६ व्या वर्षी मुलेमुली दहावी-अकरावीत असतात. मध्य प्रदेशातील इंदूर येथील तनिष्का सुजीत ही हुशार मुलगी मात्र अवघ्या १५ व्या वर्षी बीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा देण्यासाठी सज्ज झाली आहे.पुढील अभ्यास करून देशाचा सरन्यायाधीश होण्याचे तिचे स्वप्न आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचेही तिने सांगितले.



इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली तनिष्का बीए (मानसशास्त्र)च्या अंतिम वर्षाची १९ ते २८ एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा देणार आहे. तिने प्रथम श्रेणीत दहावी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर वयाच्या १३ व्या वर्षीच बारावीची परीक्षाही दिली.या विद्यार्थिनीबद्दल बोलताना देवी अहिल्या विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रमुख रेखा आचार्य म्हणाल्या, की विशेष बाब म्हणून विद्यापीठाने तिच्यासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेत तिने चांगले गुण मिळविल्याने तिला बीएच्या प्रथम वर्षात प्रवेश देण्यात आला.तनिष्काची आई अनुभा म्हणाल्या, की कोरोना साथीत पती व सासऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या मुलीसाठी या दु:खावर मात केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने