रिफायनरी नेमकी कोणासाठी? बारसूमध्ये आशिष देशमुख यांच्यासह आधिकाऱ्यांच्या कोट्यावधींच्या जमिनी

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथील रिफायनरीला स्थानिकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. राज्य सरकारकडून विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान सरकारी मोबदल्यासाठी बारसू येथे सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या अधिकारी आणि नेत्यांनी स्वस्तात जमिनी खरेदी केल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून केला जात आहेयादरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत बारसूमध्ये जमीन घेतलेल्या अधिकारी आणि नेत्यांची यादीच वाचून दाखवली आहे.सत्ताधाऱ्यांनी आपल्या जवळचे नेते आणि आधिकाऱ्यांना बारसूमध्ये स्वस्तात जमीनी दिल्याचा आरोप केला जात आहे. यादरम्यान आता बड्या अधिकाऱ्यांच्या तसेच नेत्यांच्या जमीनी बारसूमध्ये असल्याचा दावा अंधारेंनी केला आहे. त्यांनी जमीन मालकांची नावे जाहीर केली आहेत यामध्ये आशिष देशमुख यांची १८ एकर जागा बारसूमध्ये असल्याचे देखील अंधारे म्हणाल्या आहेत.



सुषमा अंधारे म्हणाल्या की...

अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता यांची ९२ एकर जमीन बारसूमध्ये आहे. हे दोघं कोण आहेत? आयआरएस आधिकारी आहेत. मला कळत नाही की आधिकाऱ्यांना एवढा पगार असतो का की ते ९२ एकर जमीन विकत घेऊ शकतात. मी गरीब आडाणी आहे, किरीटभाऊंना याच्यातलं जास्त कळतं. त्यांनी हे ९२ एकरचं काय प्रकरण आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे आधिकारी आहेत ज्यांची ९२ एकर जमीन आहे आणि जे ४० ते ५० लाख रुपयांचा भाव ही जमीन रिफायनरीसाठी सोडण्याकरिता मागत आहेत याबद्दल किरीट सोमय्या यांनी बोललं पाहिजे असे अंधारे म्हणाल्या आहेत.

बारसूमध्ये जमिनी कोणी घेतल्या…

सुषमा अंधारेंनी यादी वाचून दाखवताना घेतलेली नावे पुढीलप्रमाणे-

अकांक्षा वाकाळकर ११३ गुंटे, धार्मील झवेरी ३ हेक्टर, सोनल शाह ७.५ हेक्टर, निकेश शाह १५६ गुंटे, विकेश शाह ३ हेक्टर, रुपल शाह ४ हेक्टर अपर्णा शाह १० हेक्टर, देवेंद्र शर्मा साडेचार हेक्टर, अनुराधा रेड्डी पाच हेक्टर, सोनल शाह २ हेक्टर, श्रीकांत मिश्रा २ हेक्टर, देवेंद्र शर्मा ६ हेक्टर, शशिकांत शाह साडेचार हेक्टर, नरेंद्र सिसोदीया साडेचार हेक्टर आणि शेवटी सध्या भाजपच्या संपर्कात असलेले, काँग्रेसमधून राजिनामा देत बाहेर पडलेले अशिष देशमुख १८ एकर.यावेळी सुषमा अंधारेंनी या यादीच मराठी माणसं किती आहेत याचा देखील तपास झाला पाहिजे असेही म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने