आंदोलनाला बाहेरून लोकं आणली, आम्ही चर्चेसाठी तयार - उद्योगमंत्री सामंत

रत्नागिरी : बारसू रिफायनरी विरोधातील स्थानिकांचा विरोध वाढत असून गावकऱ्यांनी केलेले आंदोलन चिघळले आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यासाठी अश्रूधुरांचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिकही पोलिसांच्या विरोधात आक्रमक झाले असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे."आजही शेतकऱ्यांना आमचं सांगणं आहे की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर करायला शासन तयार आहे.



 मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आमच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण या ठिकाणी कोल्हापुरातीलही लोकं उपस्थित आहेत, असं राजकारण होऊ नये असं मला वाटतं." असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.काल अनेक मध्यस्थांचे मला फोन आले, मी चर्चेसाठी तयार आहे. पण सर्वांनी समन्वयाने घेतलं पाहिजे. कारण प्रकल्प अजून येणार की नाही ठरवायचं आहे. अजून तिथे प्रकल्प आला नाही पण या आधीच लोकांची माथी भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विनायक राऊत यांच्या भेटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितंल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने