राऊत राबवणार सोमय्या पॅटर्न; घोटाळ्याविरोधात भीमा पाटस कारखान्यासमोर घेणार सभा

मुंबई:  भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या 500 कोटींच्या मी आता सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली. तसेच, त्यांनी आता आक्रमक भूमिका घेत राऊत आता सोमय्या पॅटर्न राबवणार आहेत. घोटाळ्याविरोधात भीमा पाटस कारखान्यासमोर सभा घेणार आहे.संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भीमा पाटस कारखान्यासमोरी सभा घेणार असल्याची माहिती दिली. यापूर्वी त्यांनी ट्विट करत घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली.संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, सीबीआयकडेकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या 500 कोटींच्या घोटळ्याबाबत मी केलेलया तक्रारारीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने डोळेझाक केली. त्यामुळे मी आता सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघूया पुढे काय होते ते, असंही ते ट्विटमध्ये म्हणाले. 



काय म्हणाले राऊत?

अनेक खोटे लोन्स दाखवून पैसे घेणं. पैशाचा हिशोब न देण. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन वेळी तक्रार केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडे वेळदेखील मागितली. मात्र, त्यांनी अद्याप वेळ दिलेली नाही.फडणवीस गृहमंत्री झाल्यावर माझ्या आशा पल्लवीत झाल्या. मी पुन्हा एकदा त्यांना पत्र पाठवलं. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यावरुन माझ्या लक्षात आलं की फडणवीस गृहमंत्री झाल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळालं.२-५ लाखासाठी लोकांना तुरुंगात टाकलं जात. मी पुराव्यासहीत सर्व गोष्टी समोर ठेवल्या आहेत. दौडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना तसेच दादा भूसे यांचा गिरणा सहकारी कारखान्यातील १८०० कोटी घोटाळ ही देखील माहिती दिली आहे. पण कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे पाठवलं आहे.या प्रकरणी मी उद्या भीमा पाटस कारखान्यासमोर सभा घेणार आहे. शेतकऱ्यांनी ही सभा आयोजित केली आहे. माझं फडणवीसांना आव्हान आहे, शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना पाठीशी घालू नका. हे राज्य फार काळ चालणार नाही. गिरणा बचावच्या नावाखाली दादा भुसे यांनी १८०० कोटी जमा केले. पण त्याचा हिशोब नाही. पण या भ्रष्टाचारांवर राज्य सरकार कारवाई करायला तयार नाही. हे राज्याचं दुर्देव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने