महाराष्ट्रातील राजकीय गोंधळात राज ठाकरेंना मोठा धक्का! 'या' नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

नाशिक: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार ही चर्चा सुरू झाल्याने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. हे सुरू असतानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. काही वैयक्तीक कारणांमुळे आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या राजीनाम्याचं पत्र त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठवल आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.



दरम्यान पदाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिलीप दातीर शिवसेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेते आले होते. त्यानंतर त्यांची थेट शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आज त्यांनी अचानक शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.नाशिक मनसेसाठी महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. मात्र त्याच नाशिकमध्ये मनसेला धक्का बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने