जपानच्या दौऱ्यानंतर नीलम गोऱ्हेंच मोठं वक्तव्य; आता जे होईल त्याला समोर...

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही नेत्यांनी तर राज्यात येत्या १५ दिवसांत मोठा भूकंप होऊ शकतो असा दावा देखील केला आहे. दरम्यान, जपानच्या दौऱ्यानंतर विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात आगामी काळात काहीही होऊ शकतं असं सूचक विधान केलं आहे.जापान दौऱ्याहून परतल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणचं काय होणार असा सवाल उपस्थित केला. कोणीही कुठेही जाऊ शकतं. राजकारणात काहीही घडू शकतं. निवडणूक आली की गमवण्यासारखं काही नाही हे लक्षात येतं. त्यामुळे काहीही घडू शकतं. अस वक्तव्य गोऱ्हे यांनी यावेळी केलं.



तसेच, काही प्रश्नांची उत्तरं नियती आणि देव ठरवतो. अनेक शक्यता आहेत, ७-८ शक्यता आहेत. दूरगामी परिणामांचा विचार करून कधी उत्तर मिळेल? मिळणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. लोकांनी आता जे काही होईल त्याला समोर जाण्याची तयारी ठेवणं हे क्रमप्राप्त आहे, असं मोठं विधान त्यांनी केले आहे.यासोबतच, कोर्टाच्या निकालाबाबत खूप अनिश्चितता आहेत. काहीही होऊ शकतं. कोर्ट अध्यक्षांकडे प्रकरण सोपवू शकतं किंवा निवडणूक येईपर्यंत ताखाच पडतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.तसेच असं सुद्धा काही जणांचं म्हणणं की न्यायाधीशांना कोरोना झाला आहे, त्यामुळे निकाल लांबू शकतो. जुलैमध्ये अधिवेशन आहे, तोपर्यंत काहीही होऊ शकतं अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने