भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि त्याची रजिस्ट्री बंद राहणार आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार मंगळवारी याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले.त्याआधी, सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयासाठी आंबेडकर जयंतीचा अधिकृत सुट्टी म्हणून समावेश करण्याची मागणी करणारे पत्र सरन्यायाधीशांना लिहिलं होतं.



वार्षिक कॅलेंडरचा भाग म्हणून सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये १४ एप्रिलचा समावेश केला नव्हता. ही गोष्ट काही वकिलांनी अधोरेखित केली.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, गेल्या वर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकरांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली होती आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून वर्णन केले होते. "वैयक्तिकरित्या, माझ्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांबद्दल मला खूप आदर आहे. आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे आहे," असंही चंद्रचूड म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने