प्रस्थापीतांना धक्का देण्यासाठी राज्यात नव्या पक्षाची एंट्री! छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार सभा

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे. या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागलेले असतानाच राज्याच्या राजकारणात एका नव्या पक्षाने एंट्री केली आहे. नांदेडनंतर आता बीआरऐस पक्षाची मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे.तेलंगणाचे मुख्यमंत्रा बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव हे १४ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत. बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुका लढवणार असल्याची घोषणा काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. यासोबतच गाव पातळीवर देखील पक्षाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूकांधेये आता केसीआर यांचा पक्ष देखील रिंगणात असणार आहे.



महाराष्ट्रात बीएसआर पक्ष वाढविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या दोन सभांनंतर के चंद्रशेखर राव यांनी आता मराठवाड्यातील इतर भागांकडे मोर्चा वळवला आहे. याचा भाग म्हणूनत १४ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.

दरम्यान नांदेड जिल्ह्यात घेतलेल्या दोन सभांनंतर केसीआर यांच्या पक्षात परभणी जिल्ह्यातील अनेक आजी-माजी नेते, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रवेश केला आहे. किसानवादचा नारा देत केसीआर यांनी मराराष्ट्रातील शेती क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.राष्ट्रवादी, मनसे, शेतकरी संघटना अशा पक्ष व संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे हळूहळू बीएसआर पक्षाची राज्यात ताकद वाढताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने