'आदिपुरुष'चा वनवास काही संपेना! दिग्दर्शक आणि कलाकरांविरोधात FIR दाखल..

मुंबई: दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत 'आदिपुरुष' हा सिनेमा अगदी पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या वर्षी आदिपुरुषचा टीझर रिलीज झाला होता आणि तो येताच वादात सापडला होता.त्यातच काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज केले होते. पोस्टरमध्ये प्रभास आणि सनी धनुष्यबाणांसह चिलखत आणि धोतर परिधान करताना दिसत आहेत. क्रितीने साधी साडी नेसलेली आहे. मात्र सीतेच्या भांगेत कुंकू नाही आणि त्याबरोबरच राम आणि लक्ष्मणाने जानवेही घीतलेले नाही असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी या पोस्टरवरुन उपस्थीत केले. आता त्यातच दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या अडचणीही पुन्हा वाढल्या आहे.



नवीन पोस्टरमुळे प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत तसेच चित्रपटातील कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पोस्टरमध्ये हिंदू पौराणिक कथांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे.सनातन धर्माचे संत संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.आदिपुरिश दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत आणि सर्व कलाकारांविरुद्ध आयपीसीच्या कलम 295 (ए), 298, 500, 34 अन्वये मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार संजय दीनानाथ यांच्या म्हणण्यानुसार, 'रामचरितमानस' या पवित्र ग्रंथातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चरित्रावर 'आदिपुरुष' बनवण्यात आलं आहे.त्यांनी आरोप केला आहे की 'आदिपुरुष'च्या नवीन पोस्टरमध्ये भगवान राम यांना हिंदू धर्मग्रंथ रामचरितमानसमध्ये दाखविल्या आणि सांगितलेल्या आहे. त्याच्या अगदी विरोधात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्याचबरोबर तक्रारदाराने असाही दावा केला आहे की रामायणातील सर्व पात्रांनी पवित्र धागा घातला नाही, ज्याला हिंदी सनातनी धर्मात वेगळे महत्त्व आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने