कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी कारवाई; न्यायालयाने दिले आदेश

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावर नामुष्कीची वेळ आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदवाडमधील जमिनी वादाच्या प्रकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं गेल्यानं न्यायालयाने हे आदेश देण्यात आले आहेत. १९८४ पासून हा खटला चालू होता. आता न्यायालयाने नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश काढले आहेत.न्यायालयाने लेल्या आदेशानूसार खुर्च्या, लॅपटॉप, वाहन जप्त करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकारी व वकील देवराज मगदूम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.



नेमकं काय आहे प्रकरण?

कुरुंदवाड येथील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा दावा न्यायालयात दाखल हाेता. हा दावा कुरुंदवाड येथील वसंत संकपाळ यांनी दाखल केला हाेता. कुरुंदवाड येथील रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संकपाळ यांची जमीन घेतली होती.जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने संकपाळ यांनी न्यायालयाचे सन 1984 मध्ये दरवाजे ठाेठावले हाेते. दरम्यान प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे काढले आहे अशी माहिती संकपाळ यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने