'मेरे दोस्त पिक्चर अभी…'; CM शिंदे रडले म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजप नेता देणार प्रत्युत्तर

मुंबई: राज्याच्या सत्तांतराचा वादाचा अंतिम निकाल सध्या सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल येत्या काही दिवसांत लागू शकतो. मात्र या महत्वपुर्ण निकालापूर्वी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला.एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले, यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट केलं आहे.नितेश राणे यांनी ट्वीट करत लवकरच गौप्यस्फोट करायला लागेल असं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट केलं की, जेलच्या भितीने शिंदे साहेब भाजप बरोबर गेले... मग penguin आणि UT ने Disha salain च्या केसच्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले.. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच !!! 'मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है' नितेश राणे नेमके काय गोप्यस्फोट करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



आदित्य ठाकरे काय म्हणाले होते

राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह आदित्य ठाकरे हे हैदराबाद विद्यापीठात एका दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना हा गौप्यस्फोट केला आहे.एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याचे भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील.तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे ४० लोकं त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्या घरी येऊन रडले होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणा अटक करणार होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने