अतिक अहमदच्या हत्येनंतर धीरेंद्र शास्त्रींचा मोठा निर्णय, बागेश्वर बाबाचं होतंय कौतुक

उत्तर प्रदेश: गँगस्टर अतिक अहमदच्या हत्येनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात अलर्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रयागराजसह अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आला आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही उत्तर प्रदेशातील कानुपर येथील आपला दरबार पुढे ढकलली.आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सामाजिक सलोखा, शांतता राखण्यासाठी आपला कार्यक्रम ढकलण्याची घोषणा केली. एक व्हिडिओ जारी करून त्यांनी ही घोषणा केली. सोशल मीडियावर त्याच्या या निर्णयमुळे त्यांची सगळीकडे वावा होत आहे.



उमेशपाल हत्याकांडातील आरोपी असलेल्या अतिक अहमदला अहमदाबादच्या साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले. अतिक आणि त्यांचा भाऊ अशरफ यांना दोघांना शनिवारी रात्री रुग्णालयात नेत असताना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.पत्रकारांच्या भूमिकेत आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. या खळबळजनक घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्च पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान, 17 ते 21 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार होणार होता. 

पण तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.धीरेंद्र शास्त्री यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'सध्या उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामध्ये संपूर्ण राज्याच्या सुरक्षेचा विचार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.धार्मिक सलोखा बिघडू नये, कोणाचेही मन दुखावले जाऊ नये, 17 ते 21 एप्रिलची प्रस्ताविक दरबाराचा कार्यक्रम 5 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी संविधान स्वीकारले आहे, ते बजावणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे.तेथे कलम 144 लागू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रहित आणि राज्याच्या सुरक्षेतेसाठी दरवाराची तारीख पुढे ढकलली आहे. पुढील अनुकूल काळात दरबाराचे आयोजन केले जाईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच त्यांची वावा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने