राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असतानाच CM शिंदे अमित शहांना भेटणार

मुंबई:  राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. आजपासून अमित शहा दोन दिवस नागपूर दौऱ्यावर असणार आहेत.दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर आता अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.



एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.आज रात्री अमित शाह नागपूरात दाखल होणार आहेत. अमित शाह यांच्या पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हेसुद्धा रात्री नागपूरमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती आहे. अमित शहांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.

अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शाहांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.अशातच राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने