'चंद्रकांत पाटलांनी तसं बोलायला नको होतं', त्या व्यक्तव्यावरून भाजपमध्ये उघड नाराजी

मुंबई: भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्यानंतर भाजपमध्ये उघड नाराजी दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी असं बोलायला नको होतं असं वक्तव्य मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य हे वैयक्‍तिक मत असल्याच मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार बोलताना म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचं मत हे वैयक्‍तिक आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या बाबतीत भाजप कधीच काही बोलले नाही. बाबरी मशीद पाडण्याची समस्त हिंदू धर्माची मागणी होती. चंद्रकांत पाटील यांनी तसं बोलायला नको होतं. 

तर त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केलं आहे. बाबरी मशीद पाडण्यात तुमच काय योगदान आहे असा सवलही शेलार यांनी केला आहे.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर भाजपची जाहीर नाराजी दिसून येत आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्ये एकमत नसल्याचंही दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर भाजपला याचा फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आता भाजपने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.



भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, त्यात शिवसैनिक नसल्याचे वक्तव्य करून त्यावर सारवासारव करणारे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेपासून भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. ‘पाटील यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले असून, ती पक्षाची भूमिका नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या प्रक्रियेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा मोठा भाग होता, असेही बावनकुळे यांनी माध्यमांपुढे जाहीर केले. भाजपने आपली भूमिका उघडपणे सांगितल्याने पाटील हे एकाकी पडल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने