कपूर घराण्याची सून होऊनही बबिता यांना आयुष्यात नाही मिळाले सुख? करिना- करिश्मासाठी सोडलेलं घर

मुंबई: बॉलीवूड आज ज्या टप्प्यावर पोहोचले आहे, त्यात कपूर घराण्याचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. कपूर घराण्याशी संबंधित प्रत्येकाने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. या सर्वांमध्ये, एक अशी व्यक्ती आहे ज्याने बॉलिवूडमध्ये नाव आणि प्रसिद्धी मिळवली, परंतु कपूर कुटुंबाची सून झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरु झाला.बोलके असे मोठे डोळे, गोरा रंग, जो कोणी त्यांना पाहतो तो त्यांच्या सौंदर्याने वेडा होतो. होय, आम्ही बोलतोय ७० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री बबिता कपूरबद्दल. अभिनेत्रीचा जन्म 20 एप्रिल 1948 रोजी पाकिस्तानातील कराची येथे एका सिंधी कुटुंबात झाला. बबिता आज तिचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहे.



बबिताला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. बबिताने 1966 मध्ये 'दस लाख' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नसला तरी बबिताच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. बबिताला खरी ओळख 'राज' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते.1971 मध्ये बबिता यांच्या 'कल आज और कल' या चित्रपटातून रणधीर कपूरसोबत दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. काही रिपोर्ट्सनुसार, कपूर कुटुंबाला रणधीर आणि बबिता यांच्या नात्याला मान्यता नव्हती, पण ते त्यांच्या मुलाच्या आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही आणि 1971 मध्ये दोघांनी पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न केले.लग्नानंतर बबिताने चित्रपटात काम करणे बंद केले, कारण त्यावेळी राज कपूर यांचा आदेश होता की लग्नानंतर कपूर घराण्याच्या सुनेने चित्रपटात काम करू नये. दुसरीकडे, लग्नानंतर रणधीर कपूरचे करिअर ठप्प झाले, त्यामुळे त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली.रणधीर कपूरच्या या व्यसनामुळे बबिता खूप अस्वस्थ झाली होती आणि तिने तेव्हा दोन मुलींनाही जन्म दिला होता. बबिताने आपल्या मुली करिश्मा आणि करीना यांच्या चांगल्या भविष्यासाठी रणधीरचे घर सोडणे चांगले मानले आणि मुलींसोबत वेगळी राहायला लागली. मात्र, तिने रणधीरला घटस्फोट दिला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने