पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:  पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी काल (रविवारी) एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन कदम असे या मृत उमेदवाराचे नाव आहे. बीकेसी येथे पोलिस भरती दरम्यान मैदानी चाचणी सुरू आहे. या भरती प्रक्रियेत सचिन हे सहभागी झाले होते.



मैदानी चाचणीवेळी धावताना सचिन मैदानात कोसळला त्यानंतर त्यांना उपचाराकरता जवळील शासकिय रुग्णालय व्हि एन देसाई याठिकाणी दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान सचिन कदम या उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.सचिन कदम हा कल्याणहून पोलिस भरतीसाठी आल्याची माहिती आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने