Stock Market : 1 रुपयाच्या Hindustan Foods स्टॉकने बनवले कोट्यधीश, कसे ते जाणून घेऊयात...

मुंबई: एफएमसीजी सेक्टरमधील देशातील सुप्रसिद्ध ब्रँड्सचे मालक हिंदुस्थान फूड्सचे  शेअर्स या महिन्यात तीन दिवसांत सुमारे 11 टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे लाँग टर्ममध्ये त्यांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे.मात्र यावर्षी त्यात 9 टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या, हिंदुस्तान फूड्सचे शेअर्स बीएसईवर 565.35 रुपयांवर आहेत. त्याची मार्केट कॅप 6,373.91 कोटी आहे.21 ऑगस्ट 2012 रोजी हिंदुस्थान फूड्सचे शेअर्स फक्त 1 रुपयाला होते. सध्या तो 56,435 टक्क्यांनी वाढून 565.35 रुपयांवर आहे, म्हणजेच केवळ 18 हजारांच्या गुंतवणुकीवर त्यांनी गुंतवणूकदारांची संपत्ती 1 कोटी बनवली. हिंदुस्तान फूड्सच्या शेअर्सने लाँग टर्मसह शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे.



गेल्या वर्षी, त्याचे शेअर्स 21 जून 2022 रोजी 328.73 रुपयांवर होते, जो त्याचा विक्रमी उच्चांक आहे. यानंतर, पुढील सहा महिन्यांत, 5 डिसेंबर 2022 रोजी ते 128 टक्क्यांनी वाढून 749.15 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मात्र, शेअर्सची तेजी इथेच थांबली आणि सध्या ती या पातळीपासून 25 टक्क्यांनी घसरली आहे.हिंदुस्थान फूड्स ही एफएमसीजी सेगमेंटमधील कंपनी आहे. हे लॅकमे, मूव्ह, डीकोल्ड, विम, व्हीट,नायसिल, हार्पिक, ब्रूक बॉन्ड रेड लेबल, ब्रू, सनसिल्क, क्लिनिक प्लस, संतूर, रिन, सनसिल्क, डेटॉल आणि नॉरसारख्या सुप्रसिद्ध ब्रँड्सचे प्रॉडक्ट्स बनवते. प्रमोटर्सची यात 64.85 टक्के भागिदारी आहे.नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने