उत्तर प्रदेशात अतिकची नव्हे तर कायद्याची अंतयात्रा निघाली; तेजस्वींचा योगी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली:  अतीक-अशरफ हत्येनंतर उत्तर प्रदेश सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. या मुद्द्यावरून देशातील आणखी दोन दिग्गज नेत्यांनी यूपी सरकारला (उत्तर प्रदेश सरकार) घेरले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी यूपी सरकार टीका केली आहे.बिहारचे मुख्यमंत्री म्हणतात, कोणीही तुरुंगात जाऊन कोणाला मारू शकतो का? आरोपीला शिक्षा काय होईल हे न्यायालय ठरवते. त्यामुळच राज्यघटना तयार करण्यात आली आहे. तर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, गुन्हेगारी संपवणे म्हणजे गुन्हेगारांना मारणे नव्हे, तर न्यायालयात न्याय देणे आहे.



पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. तेजस्वी यादव यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून गँगस्टर आणि त्याच्या भावाची हत्या ही स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांवरही न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. मात्र उत्तर प्रदेशात जे घडले अत्यंत वाईट होतं. तिथं अतीक अहमदची अंत्ययात्रा नव्हती निघाली तर कायद्याची अतंयात्रा निघाली आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "उत्तर प्रदेशातील अराजकता आणि कायदा-सुव्यवस्था पाहून मला धक्का बसला आहे. पोलिस आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीला न जुमानता गुन्हेगार आता कायदा हातात घेत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने