KKR विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCBला धक्का! धडाकेबाज बॅटर आयपीएलमधून बाहेर

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. रजत पाटीदार गेल्या काही काळापासून त्याच्या टाचेच्या दुखापतीतून सावरत होता. 



बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रजत पाटीदारला आयपीएल 2023 मधून वगळल्याची माहिती दिली. रजत पाटीदारचा फोटो शेअर करताना आरसीबीने लिहिले की, दुर्दैवाने तो दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर आहे आणि आम्ही त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने