''मी निर्दोष, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास...'', FIR दाखल केल्यानंतर ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया

दिल्ली:   मी निर्दोष आहे आणि तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. मी तपास यंत्रणेला पुर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो असे WFI प्रमुख आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणाले.भाजप खासदार आणि ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीत खेळाडू आंदोलन करत आहेत.ब्रिजभूषण सिंह यांनी आंदोलनामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण म्हणाले की, एफआयआर दाखल करण्याबाबत चर्चा झाली आहे.एफआयआरची प्रत सध्या माझ्याकडे नाही. पण एफआयआर झालीच असेल तर मला त्यात काही गैर दिसत नाही. माझा दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे. मी या आरोपांना सामोरे जाण्यास तयार आहे.



बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीत खेळाडू आंदोलन करत आहेत. त्यांना क्रिडा जगतातील अनेक खेळाडूंकडून पाठिंबा मिळत आहे.अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत.रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशातील दिग्गज कुस्तीपटू दिल्लीत धरणे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या या लढ्याला अनेक राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे.यावर आता विनेश फोगट यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विनेशने भारतीय क्रिकेटपटू आणि इतर आघाडीच्या खेळाडूंच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. संपूर्ण देश क्रिकेटची पूजा करतो, मात्र एकाही क्रिकेटरने या प्रकरणावर भाष्य केलं नाहीये असे ती म्हणाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने