माझी पाठवणी करण्यासाठी...भर मैदानात धोनी झाला भावुक

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्सने रविवारी झालेल्या लढतीत कोलकता नाईट रायडर्स संघावर ४९ धावांनी विजय मिळवला. चेन्नई सुपरकिंग्सने पाचव्या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. पण, महेंद्र सिंह एका गोष्टीमुळं भावूक झाल्याचे पाहायला मिळालं.'ईडन गार्डन्सच्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. ते सर्वजण मला निरोप देण्यासाठी आले होते.'... आयपीएलच्या 16 व्या सीझनमध्ये काल रात्री कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवल्यानंतर महेंद्र सिंह धोनीने मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहतेदेखील भावुक झाले आहेत.सामना संपल्यानंतर मैदानावर पोहोचलेले चाहते पुरस्कार सोहळ्यात धोनीचा आवाज ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबले. माहीने चाहत्यांचे आभार मानले आणि हातवारे करत सांगितले की, आता एक खेळाडू म्हणून तो या मैदानावर पुढचा सामना खेळू शकणार नाही अर्थात त्याची आयपीएल निवृत्ती लवकरच होणार आहे.



धोनी नेमकं काय म्हणाला?

ईडन गार्डन्सवर केकेआरचे समर्थक हवे होते. पण मोठ्या संख्येने सीएसकेच्या चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. इतकचं नव्हे तर धोनीचा मोठा चाहता वर्ग सीएसकेच्या जर्सीमध्ये पाहायला मिळाला. हे पाहून धोनी भावुक झाला.सर्व चाहत्यांना आभार. खुप संख्येने उपस्थिती लावलीय. पुढच्यावेळी यामधील अनेकजण केकेआरची जर्सी परिधान करुन येतील. ते माजी पाठवणी करण्याच प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. त्याचे हे भावुक शब्दामुळे धोनी यंदाच्या वर्षीच आयपीएलमधून निवृत्ती घेणार हे नक्ती.

2008 ते 2015 या काळात धोनी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी लागल्याने 2016 ते 2017 या दोन पर्वात रायझिंग पुणे सुपरजायन्ट संघाकडून खेळला. त्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या हाती आली.महेंद्र सिंह धोनीचं हे 16 वं पर्व आहे. त्यात धोनीचं वय 41 वर्षे असून 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यानंतर आतापर्यंत धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने