गोमूत्राला काय करता…म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर; IVRI च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

मुंबई: आयुर्वेदात माणसांच्या आरोग्यासाठी गोमूत्र हे खूप फायदेशीर असल्याचे सांगीतले आहे. मात्र एका रिसर्चमध्ये नवीन खुलासा समोर आला आहे, ज्यामध्ये गोमूत्रात अनेक हानिकारक बॅक्टीरिया असतात जे आरोग्यासाठा हानिकारक असतात असे सांगण्यात आले आहे.उत्तर प्रदेशमधील इज्जतनगर येथील भारतीय पशुवैद्यकीय संस्था (IVRI) ने एका रिपोर्रमध्ये दावा खेला आहे की गाईच्या दुधामध्ये देखील कमीत कमी १४ विविध प्रकारचे बॅक्टीरिया आढळतात. तसेच रिपोर्टमध्ये गाईच्या तुलनेत म्हशींच्या मूत्रात कमी बॅक्टीरिया आढळतात असेही सांगण्यात आले आहे. जनसत्ताने यासंभदीचे वृत्त दिले आहे.

हा रिपोर्ट भोजराज सिंह आणि पीएचडीच्या तीन विद्यार्थ्यांनी मिळून तयार केला आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की गायींच्या दुधामध्ये Escherichia Coli चे अंश देखील आढळतात. ज्यामुळे पोटाचे विकार होतात. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की लोकांनी गोमूत्र पिणे टाळले पाहीजे. यामुळे ते आजारी पडू शकतात.टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टचा हवाल्याने सांगण्यात आले आहे की गाय, म्हैस आणि माणसांच्या ७३ यूरिन सॅम्पल्सच्या स्टॅटिस्टीकल विश्लेषणातून समोर आलं आहे की, म्हशींचे यूरिन हे गाईंच्या यूरिनपेक्षा अधिक लाभदायक असते.



रिसर्चमध्ये भोजराज सिंह यांनी सांगितले की त्यांच्या टीमने साहीवाल, भारपारकर, विंदावनी (क्रॉस ब्रीड) गायींचे यूरिन सॅम्पल घेतले, यानंतर माणसांचे यूरिन आणि म्हशींचे सॅम्पल देखील घेतले गेले. ही रिसर्च मागील वर्षीच्या जून पासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत करण्यात आली. यामध्ये आढळले की एका निरोगी व्यक्तीच्या यूरिनमध्ये देखील हानिकारक बॅक्टीरिया असतात. मात्र यईच्या डिस्टिल यूरिनमध्ये हानिकारक बॅक्टीरिया असतात की नाही यावर अद्याप रिसर्च होणे बाकी आहे.

गोमूत्र पिणे हानिकारक ठरू शकतं

भोजराज सिंह यांनी सांगितलं की माणसाने गायींचे यूरिन पिणे टाळायला हवे. यामुळे अनेक अजार होऊ शकतात. गोमूत्रामध्ये अनेक बॅक्टीरिया आढळतात जे माणवी शरिरासाठी हानिकारक ठरू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने