अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप?

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीतील पक्षांतील अनेक नेते, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सत्तांतर करताना दिसून येत आहेत. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून तशा हालचाली सुरू आहेत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार बसणार असल्याचं दिसून येत आहे. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते खरंच ठरलं आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे राजकीय वर्तुळातून नेते गांभीर्याने पाहत आहेत.



संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. मला तरी असं वाटतं आहे की अनेक दिवसांपासुन ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे असं संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.एवढा मोठा नेता असून त्यांना काँग्रेसमध्ये बरोबर वागणूक मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील. तसेच प्रयत्न चालू आहेत. अनेक घडामोडी तशा सुरू आहेत. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. 

विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.एवढा मोठा नेता असून त्यांना काँग्रेसमध्ये बरोबर वागणूक मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील. तसेच प्रयत्न चालू आहेत. अनेक घडामोडी तशा सुरू आहेत. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने