केवळ 30 मिनिटांत चार्ज होणारा Laptop लाँच, देणार 4 तासांचा बॅटरी बॅकअप

मुंबई: जुन्या लॅपटॉपमुळे तुम्ही हैराण झाला असाल आणि तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर Acer तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन स्विफ्ट गो लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लेटेस्ट लॅपटॉपमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स पाहायला मिळतील आणि या डिव्हाईसची किंमत किती निश्चित करण्यात आली आहे, याबद्दल जाणून घेऊ.

Acer Swift Go चे तपशील

लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. याशिवाय डोळ्यांच्या सुरक्षेसाठी कंपनीने या लॅपटॉपमध्ये TÜV Rheinland डिस्प्ले देखील दिला आहे. Acer ब्रँडच्या या लॅपटॉपमध्ये 13व्या पिढीचा इंटेल कोअर एच सीरीज प्रोसेसर, तसेच 16 GB LPDDR5 रॅम आणि SSD स्टोरेज देण्यात आले आहे.कंपनीने हा लॅपटॉप स्लिम आणि पोर्टेबल डिझाइनसह लॉन्च केला आहे, ज्याची जाडी 14.9 मिमी आहे आणि त्याचे वजन 1.25 किलो आहे. चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, स्विफ्ट गो लॅपटॉप फक्त 30 मिनिटांच्या चार्जवर 4 तासांची बॅटरी लाइफ देण्याचा दावा करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला या Acer लॅपटॉपमध्ये 2 USB Type C पोर्ट, microSD स्लॉट, HDMI 2.1 आणि Wi-Fi 6 सारखी वैशिष्ट्ये मिळतील. हा लॅपटॉप 1440p QHD कॅमेरासह लॉन्च करण्यात आला आहे जो Acer च्या टेम्पोरल नॉइज रिडक्शन तंत्रज्ञानाचा वापर करतो.लॅपटॉपमध्ये ड्युअल फॅन सिस्टम, ड्युअल G6 कॉपर हीट पाईप्स आणि एअर इनलेट कीबोर्ड आहे जे लॅपटॉपला थंड ठेवण्यास आणि लॅपटॉपची कार्यक्षमता वाढविण्यात मदत करेल. लॅपटॉपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी ऑटोमॅटिक फ्रेमिंग आणि बॅकग्राउंड ब्लर सारखे पर्याय देण्यात आले आहेत.



Acer Swift Go ची भारतात किंमत

या नवीन Acer लॅपटॉपची किंमत 79 हजार 990 रुपयांपासून सुरू होते आणि तुम्ही कंपनीच्या एक्सक्लूसिव्ह स्टोअर, क्रोमा, एसर ई स्टोअर, अॅमेझॉन आणि विजय सेल्समधून हे डिव्हाइस खरेदी करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने