गांधी घराण्यावर संघर्षाची वेळ, इंदिराजींप्रमाणं राहुललाही साथ द्या; प्रियांकांची भावनिक साद

चिक्कमंगळूर: इंदिराजींना त्यांच्या कठीण काळात चिक्कमंगळूरच्या जनतेनं साथ दिली. जनतेनं आशीर्वाद देऊन लोकसभेत निवडून दिलं. आज कॉंग्रेस आणि गांधी घराण्यावर अशीच संघर्षाची वेळ आली आहे. काँग्रेस आणि आम्हा सर्वांना तुमची निश्चितपणे साथ मिळेल, असं भावनिक आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा

'इंदिरा गांधींवर खोटा गुन्हा दाखल'

चिक्कमंगळूर जिल्ह्यातील नागरिकांशी असलेल्या त्यांच्या सहवासाची प्रियांकानी या वेळी आठवण करून दिली. आपला भाऊ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरविल्याचा संदर्भ देत प्रियांका म्हणाल्या, की 'इंदिरा गांधींना जवळपास ४५ वर्षांपूर्वी ज्या घटनेचा सामना करावा लागला होता, तीच घटना आज पुन्हा घडली आहे. तेव्हा इंदिरा गांधींवर खोटा गुन्हा दाखल केला होता. देव आणि लोकांच्या आशीर्वादाने आपण सत्यासाठी लढत आहोत आणि विजयी होऊ.'



'त्या दिवशीही पाऊस पडत होता'

काँग्रेसनं आयोजित केलेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘‘माझे वडील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी ही येथे आले होते. इंदिराजीही येथे आल्या होत्या आणि जेव्हा त्या येथे आल्या तेव्हा त्यांच्यासाठी संघर्षाचा काळ होता. १९७८ मध्ये इंदिराजी या भूमीवर आल्या, त्या दिवशीही पाऊस पडत होता. पाऊस हा शुभशकून आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. मीही तुमच्यासमोर स्टेजवर, त्याच मैदानावर आणि त्याच वातावरणात उभी आहे. माझ्या कुटुंबातील तीन पिढ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानते. इंदिराजींनी सांगितलं की, जेव्हा त्या त्यांच्या संघर्षाच्या अत्यंत कठीण काळातून जात होत्या, तेव्हा चिक्कमंगळूरची जनता त्यांच्या पाठीशी उभे राहिली.’’

भावासाठी आशीर्वाद मागितला...

श्रृंगेरी शारदाम्मा देवीला प्रार्थना केली. तिथे मला शंकराचार्य भेटले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथून निवडणूक लढवली होती का, असा सवाल त्यांनी केला. होय, मी म्हणाले की त्यांनी चिक्कमंगळूरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी आशीर्वाद दिला. मी माझ्या भावासाठी आशीर्वादही मागितले, असं प्रियांका यांनी श्रृंगेरी मंदिराला भेट दिल्यानंतर सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने