'मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर'..तर अभिनेत्रीनं दिली मजेदार उत्तर

मुंबई: 'जानशीन' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत धुराळा उडवणारी अभिनेत्री सेलिना जेटली ही पडद्यावरून गायब झाली असली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री अनेक समस्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करत असते दरम्यान, एका ट्विटर युजरने सेलिनाला थेट लग्नाचा प्रस्ताव दिला आहे, तर या प्रपोजलला सेलिनाच्या उत्तराची सध्या सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.एका ट्विटर युजरने गुरुवारी सेलिनासाठी ट्विट करत एका पोस्टमध्ये लिहिले की, “सेलिया जेटलीला शुभेच्छा. माझी तब्येत बरी नाही. माझी काळजी घ्यायला कोणी नाही....माझी तब्येत जास्त बिघडण्याआधी मला लवकर तुझ्यासोबत घेऊन जा. लवकरात लवकर लग्न माझ्याशी कर. मी पण घर जावई व्हायला तयार आहे. माझं जीवन आणि आरोग्य वाचवं. उत्तर दे आणि रिप्लाय कर.रिस्पेक्ट. कोलकाताहून विजय मगनलाल वोरा."



हे ट्विट काही क्षणातच व्हायरल झालं आणि त्यानंतर या ट्विटला सेलिना

तर अभिनेत्रीनेही चाहत्यांच्या या लग्नाच्या प्रस्तावाला मजेशीर उत्तर दिले. चाहत्यांच्या पोस्टला उत्तर देताना सेलिनाने लिहिले, “मी माझ्या नवऱ्यला आणि तीन मुलांना विचारेन आणि रिवर्ट येईन!” त्या चाहत्यांच्या ट्विटनंतर सेलिनाच्या या मजेशीर उत्तरानं सोशल मिडियावर एकच गोंधळ उडला.ऑस्ट्रेलियात स्थायिक सेलिना जेटलीने ऑगस्ट 2011 मध्ये पीटर हागशी लग्न केले. या जोडप्याला 11 वर्षांची दोन जुळी मुले आणि पाच वर्षांचा मुलगा आर्थर आहे.सेलिना चित्रपटांपासून दूर हॅप्पी मॅरेज लाइफ एन्जॉय करत आहे. सेलिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने 'जनशीन', 'नो एंट्री', 'अपना सपना मनी मनी' आणि 'गोलमाल रिटर्न्स'मध्ये काम केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने