घरी मोरपीस ठेवल्याने घरात राहातो देवी देवतांचा वास अन् आर्थिक अडचणीही होतात दूर

मुंबई: हिंदू धर्मात मोरपिस खूप शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णही आपल्या मुकुटात मोरपंख घालत असत. भगवान श्रीकृष्णांना मोरपिस खूप आवडायचं आणि त्यांच्या आवडत्या गोष्टींपैकी मोरपिस हे एक होते. वास्तुशास्त्रातही मोराचे पंख अत्यंत शुभ फळ देणारे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेने मोरपिस ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रगतीचा मार्गही उघडा होतो.घरात मोराचे पिस ठेवल्याने देवता आणि नऊ ग्रहांचाही वास होतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि सकारात्मकतेचा घरात वास राहातो. घरामध्ये मोराची पिसे लावल्याने येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. घरात मोराची पिसे बसवल्याने सुख-शांती राहते. घराच्या आग्नेय दिशेला मोराचे पंख लावावेत. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते.



आर्थिक टंचाई

पूजेच्या ठिकाणी मोराचे पिसे ठेवल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात आणि घरात आनंदाचे वातावरण राहते. यासोबतच त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात तसेच भरपूर पैसा मिळतो, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते.हिंदू धर्मात मोराच्या पिसांना अतिशय पवित्र मानले जाते. अशा वेळी अनेकजण मोराची पिसे घरात ठेवतात. घरामध्ये मोराची पिसे योग्य दिशेला ठेवल्यास फायद्याची संधी निर्माण होते आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. 

या काही गोष्टी लक्षात ठेवा

घराच्या मुख्य दरवाज्यावर कचऱ्याची पेटी ठेवू नये.

घरात खरकटी भांडी ठेवू नये.

संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेत झोपू किंवा जेवू नये. असे केल्याने घरात दरिद्री पसरते.

घरात मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती लावणे फार शुभ मानले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने