"पटोले लवकरच गुवाहाटीत! त्यांना महिन्याला 1 खोका मिळतो"; काँग्रेस नेत्याच्याच आरोपामुळं खळबळ

नागपूर : प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. पटोले लवकरच गुवाहाटीला असतील त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो, या त्यांच्या विधानामुळं खळबळ उडाली आहे.वारंवार पक्षाच्या नेत्यांवर आरोप केल्यामुळं आशिष देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. याबाबतचा अहवाल काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडं पाठवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली बाजू मांडली आहे.

देशमुख म्हणाले, "माझी विधानं ही पक्षविरोधी वक्तव्ये म्हणता येणार नाहीत, मी पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी भूमिका घेतली आहे. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामाबाबत सर्व माहिती मी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे अडीच-तीन महिन्यांपूर्वी कानावर घातली आहे. पण ही बाब त्यांनी तक्रारीच्या स्वरुपात घेतली की काय? मला माहिती नाही"



पटोले १६ एप्रिलला गुवाहाटीत असतील

प्रदेशाध्यक्ष माझ्याविरोधात तक्रार करत असतील तर ही कारवाई चुकीची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मविआच्या सभेत नाना पटोलो हजर नव्हते कारण ते आजारी नव्हते हे त्यांनीच स्पष्ट केलं आहे. पण ते सूरच्या मार्गावर होते अशी माहिती मला मिळाली आहे. सूरतच्या मार्गावर कोण असतं? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. यानंतर आता १६ एप्रिल रोजी पटोले गुवाहाटीत असतील, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महिन्याला १ खोका मिळतो, असा गंभीर आरोपही यावेळी देशमुख यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने