NMACC कार्यक्रमात आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर, जाणून घ्या काय आहे सत्य

मुंबई: नुकतेच मुंबईत 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चे ग्रँड ओपनिंग झाली. स्टार्सने जडलेल्या या कार्यक्रमात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या तारकांची जत्रा होती. शाहरुखपासून सलमान, ऐश्वर्या, दीपिका-रणवीर, आलिया भट्ट, रेखा, सर्व ए-लिस्टर स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते.या इव्हेंटमध्ये सुहाना खान, आर्यन खानपासून ते अनन्या पांडेपर्यंत सर्व स्टार किड्स दिसले. त्याचवेळी, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये आर्यन खान अभिनेत्री अनन्या पांडेला इग्नोर करताना दिसत आहे. यानंतर आर्यन खानने पुन्हा अनन्याला इग्नोर केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.



व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनन्या पांडे तिच्या BFF सुहाना खानला भेटताना दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये गौरी खान आणि आर्यनही दिसत आहेत. यादरम्यान गौरी अनन्यासोबत हसताना दिसली पण आर्यन अनन्याला इग्नोर करताना दिसला. अनन्यानेही आर्यनकडे दुर्लक्ष केले.यानंतर दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. मात्र, गौरी खानने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

गौरी खानने इंस्टावर फोटो शेअर केले आहे. यामध्ये आर्यन खान त्याची आई गौरी खान, बहीण सुहाना आणि अभिनेत्री अनन्या पांडेसोबत पोज देताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या फोटोमध्ये आर्यनने अनन्याच्या कमरेवर हात ठेवून फोटो क्लिक केला आहे.आर्यन खान या फोटोत खूपच सीरियस लूकमध्ये दिसत आहे. तिथे त्याच्यासोबत उभी असलेली अनन्या हसत आहे. या फोटोंवरून हे स्पष्ट झाले आहे की, दोघांमधील विभक्त झाल्याची बातमी खरी नाही.याआधीही अनेकवेळा आर्यन खानने अनन्याला इग्नोर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, या दोघांचे एकत्र फोटो पाहून आता त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने