पवारांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सूर बदलले, राहुल गांधी म्हणाले...

मुंबई: राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी विरोधी आणि सत्ताधारी पक्षांकडून जोरदार सुरू आहे. अशातच काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेलं विधान पाहून पवार  सोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सूर बदलले अशी नवी चर्चा रंगली आहे.कालच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही सर्व एक आहोत, असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.



राहुल गांधी उद्धव ठाकरेंचीही घेणार भेट

शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर आता राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. लवकरच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा होईल अशी माहिती आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट होणार आहे. सावरकर वादानंतर काँग्रेसकडुन एक प्रकारे डैमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.गेल्या काही दिवसांपासून सावरकरांसंदर्भात सुरु असलेला वाद निवळला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशासह राज्यभरात वाद पेटला होता. त्याचदरम्यान, शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली.त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या विषयांवर काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने टीका करणे टाळले पाहिजे, असा स्पष्ट सल्ला पवार यांनी गांधी कुटुंबीयांना दिल्याचे समजते. पवारांच्या त्या सल्ल्यानंतरच राहुल गांधी यांनी, ‘यापुढे आपण सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणार नाही,’ असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.हे सर्व पाहता राजकीय वर्तुळात पवारांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सूर बदलले या चर्चेने जोर धरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने