'मी फक्त शरद पवारांच ऐकतो', अजित पवार-संजय राऊत मतभेद वाढले

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नेते अजित पवार भाजपसोबत जात राज्यात नवी सत्ता स्थापन करणार या चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्वा चर्चांना फटकारले तसेच यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांचाही समाचार घेतला. दरम्यान आता राऊतांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. त्यांमुळे आता राज्यात अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामधील मतभेट वाढले अशी चर्चा सुरु आहे.अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. त्यानंतर राऊतांनी मी फक्त शरद पवारांच ऐकतो असं म्हणत पवारांच्या वक्तव्याला फटकारले. तसेच मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. सत्य बोलतो. असही राऊत म्हणाले.



काय म्हणाले राऊत?

राष्ट्रवादी फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांच ऐकतो. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडली. मी मविआचा चौकीदार आहे. सेनाफुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता?फोडण्याचं कारण काय शिवसेना फुटली तेव्हा तुम्हीदेखील वकिली करत होता. ते आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत रहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल. त्यासाठी जर आमच्यावर कोणी खापर फोडणार असले तर ही गमंत आहे.अजित पवारांनी तुम्हाला टार्गेट केलं यासंदर्भात विचारलं असता, मला कोणी टार्गेट केलं तर मागे जाणारा माणून नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी नेहमी सत्य बोलतो. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर प्रेशर आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. मी माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे. आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय.त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊतांबद्दल संताप व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने