'त्या'च्यासारखं दिसण्यासाठी अमृतपालने प्लास्टिक सर्जरी केली; इंदिरा गांधींच्या खुनाशी..

पंजाब: खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर आहे. अजूनही पोलिस त्याला पकडू शकलेले नाहीत. अशातच त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे.अमृतपालने भारतात येण्याआधी कुप्रसिद्ध खलिस्तानी नेता भिंद्रनवालेसारखा दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली, अशी माहिती हाती येत आहे. जॉर्जियामध्ये अमृतपालने ही सर्जरी केली होती. याचा खुलासा अमृतपालचे सध्या डिब्रूगढमध्ये असलेल्या जेलमध्ये आहेत.



'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमृतपालच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, तो जवळपास २ महिने जॉर्जियामध्ये राहिला होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अमृतपालने भिंद्रनवाले याच्यासारखं दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेतली.अमृतपाल १८ मार्चपासून फरार आहे. त्याचे काका हरजीत सिंग आणि दलजित सिंह यांच्यासह त्याच्या ८ निकटवर्तीयांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून अमृतपालला जरनैल सिंह भिंद्रनवाले २.० असं म्हटलं जात आहे. भिंद्रनवाले याने १९८० च्या दशकामध्ये दहशत माजवली होती. 

भिंद्रनवाले याने खलिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी केली होती, ज्यामुळे पूर्ण पंजाबात खळबळ माजली होती. त्याच्याच प्रमाणे अमृतपाल डोक्यावर मोठी आणि जड पगडी घातल्याचं दिसत आहे. तसंच गर्दीच्या भावना भडकवणारी भाषणं देताना दिसत आहे. भिंद्रनवाले याचा खात्मा करण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर काही काळातच हिंदू-शीख दंगल झाली आणि त्यानंतर इंदिरा गांधींची हत्याही झाली. ही हत्या भिंद्रनवालेच्या हत्येचा बदला म्हणून झाल्याचंही बोललं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने