अखेर मुंबईनं खातं उघडले! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण पुढं? पाहा संपूर्ण पॉइंट टेबल

मुंबई: आयपीएल-2023 सुरू झाली आहे. गतवेळेप्रमाणेच यंदाही या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज धोनीच्या नेतृत्वाखाली 4 वेळा चॅम्पियन बनले आहेत. गुजरात टायटन्स हा गतविजेता आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा पराभव करून त्याने विजेतेपद पटकावले.आयपीएलच्या 16व्या हंगामातील 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. मंगळवारी (11 एप्रिल) रोजी झालेल्या या विजयासह मुंबईचे खाते पॉइंट टेबलमध्ये उघडले आहे. मुंबईने सहा विकेट्स राखून सामना जिंकला. मुंबईविरुद्धचा पराभव हा दिल्लीचा मोसमातील चौथा पराभव आहे. आतापर्यंत चार सामन्यांत त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही.

लखनऊ सुपर जायंट्सने चार सामन्यांपैकी तीन जिंकत आणि एक सामना गमावल्यानंतर सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ तीन सामन्यांत दोन विजय आणि एक पराभवानंतर चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सचे प्रत्येकी चार गुण आहेत. दोघेही अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचेही चार गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचेही चार गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहे.



ऑरेंज कॅप कोणाकडे?

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन ऑरेंज कॅपच्या बाबतीत टॉपवर आहे. त्याने तीन सामन्यातील तीन डावात 225 धावा केल्या आहेत. धवनचीही सरासरी देखील 225 आहे. त्याने 149.00 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.तीन सामन्यांत त्याची दोन अर्धशतके आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध 47 चेंडूत 51 धावांची खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चार सामन्यांत त्याच्या 209 धावा आहेत. वॉर्नरची सरासरी 52.25 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 114.83 आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऋतुराजने तीन सामन्यांत 94.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत.

गोलंदाजांमध्ये मार्क वुड अव्वल

दिल्ली-मुंबई सामन्यानंतर गोलंदाजांच्या यादीत टॉप-5मध्ये कोणताही बदल झालेला नाही. लखनऊ सुपरजायंट्सचा मार्क वुड अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याने तीन सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यांत त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत. तर गुजरात टायटन्सचा रशीद खान आठ विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने