अतिकच्या हत्येनंतर वाढली मुख्यमंत्री योगींची लोकप्रियता; सर्वे नेमका काय सांगतो?

उत्तर प्रदेश: माफीया ते राजकीय नेता असलेल्या अतिक अहमद याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. एका सर्वेमधून ही माहिती उघड झाली आहे.अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोघांनाही कॉल्विन रुग्णालयाच्या बाहेर मारण्यात आलं. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथांवर हल्ला चढवला.समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला. तसंच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर काहींनी अतिक अहमदसारख्या माफियाला मारणं योग्य समजलं आहे.



या हत्याकांडानंतर एक सर्वे करण्यात आलेला होता. ज्यामध्ये अतिक अहमदच्या मृत्यूनंतर योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढल्याचं निदर्शनास आलेलं आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटर यांच्या वतीने एक सर्वे करण्यात आलेला होता.या सर्वेमधून ४४ टक्के लोकांनी योगींची लोकप्रियता वाढल्याचं नमूद केलं. तर ३० टक्के लोकांनी योगींच्या लोकप्रितयेमध्ये घट झालीय. १५ टक्के लोक म्हणतायत की अतिक अहमदच्या हत्याकांडाचा काहीही फरक पडलेला नाही. ११ टक्के लोकांनी काहीही माहिती नसल्याचं उत्तर दिलंय. सदरील सर्वे २४ एप्रिल ते २६ एप्रिलदरम्यान करण्यात आलेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने