चीनची चर्चेची हवी तयारी

टोकियो:  चीनबरोबरील चर्चेच्या आघाडीवर प्रगती करणे शक्य होईल अशी अमेरिकेला अपेक्षा आहे, पण त्यासाठी चीनने स्वतः तशी इच्छा स्पष्ट करायला हवी, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केले.जी-७ समुहाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्लिंकन जपानच्या दौऱ्यावर आले आहेत. चीनबरोबरील अमेरिकेची चर्चा ठप्प झाली आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, गेल्या वर्षी उभय देशांचे प्रमुख ज्यो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठकीत चर्चेची द्वारे खुली ठेवण्यावर भर देण्यात आला होता. त्यादिशेने प्रगतीची आम्हाला अपेक्षा आहे.बैठकीबाबत ब्लिंकन म्हणाले की, कारुईजावा येथे मी इतर मंत्र्यांशी चर्चा केली. त्यावरून तैवानबाबत आम्ही घेत असलेल्या भूमिकेवर सुस्पष्ट एकमत आहे. चीनबाबत चिंतेचे जे मुद्दे आहेत आणि त्याचे निराकरण व्हावे म्हणून आम्ही काय प्रयत्न करीत आहोत याविषयी बैठकीत अप्रतिम अभिसरण झाले.



मॅक्रॉन यांचा मतभेदाचा मुद्दा

चीनवरून जी-७ समूहात मतभेद असल्याचे संकेत मिळाले आहेत. यात प्रामुख्याने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्टपणे मुद्दा मांडला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या आक्रमक कृत्यांवरून जी-७ समूह चिंतित असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने