राजाराम महाराजांचा विवाह झाला आणि अवघ्या काही दिवसातच स्वराज्यावर...

मुंबई:  इ. स. १६८० च्या प्रारंभी शिवाजी महाराजांनी आपल्या बहुतेक शत्रूंना नामोहरम केल्याचे आढळून येते. फेब्रुवारीमध्ये मुघलांचा पराभव करण्यामध्ये महाराजांना यश आले. इंग्रज लोक सिद्दींना मदत करत आहेत हे लक्षात आल्यावर महाराजांनी इंग्रजांनाही धडा शिकविला. आपला निभाव लागणार नाही हे ओळखून इंग्रजांनी जानेवारी १६०० मध्ये शिवाजी महाराजांशी तह केला व यापुढे सिद्दींना मदत करणार नाही असे आश्वासन दिले.सिद्दी कासीम मात्र मुघलांच्या मदतीमुळे समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. खांदेरीवर शिवाजी महाराज तटबंदी बांधत आहेत हे पाहून तेथून जवळच असलेले उंदेरी हे बेट सिदी कासीमने जिंकून घेतले. त्यामुळे सिद्दी आणि मराठे यांच्यामधील संघर्ष १६८०च्या उन्हाळ्यातही चालू राहिला.



एक सिद्दी जर सोडला तर महाराजांचे बाकीचे सर्व शत्रू एकतर नामोहरम झाले होते किंवा महाराजांशी तह करून सुरक्षित रहाण्याचा प्रयत्न करीत होते. अशा प्रकारे आपल्या सर्व शत्रूंचा बंदोबस्त झाल्यावर फेब्रुवारी १६८० मध्ये शिवाजी महाराज रायगडावर परतले. ७ मार्च १६८० रोजी राजारामाचा उपनयनविधी करण्यात आला. त्यानंतर १५ मार्च रोजी राजारामाचा विवाह प्रतापराव गुजराच्या मुलीबरोबर करण्यात आला.अशाप्रकारे मंगल कार्यामुळे रायगडावर मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अचानकपणे शिवाजी महाराज रक्तातिसाराने आजारी पडले आणि हे दुखणे विकोपास जाऊन चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ म्हणजे ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला. स्वराज्यावर मोठा आघात झाला. रायगडावर शोकसागर उसळला. ऐन उमेदीच्या वयात झालेला महाराजांचा मृत्यू म्हणजे चौफेर विस्ताराची वाटचाल करणाऱ्या स्वराज्यावर मोठा आघात होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने