क्वालिटी लाईफ देणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा नंबर ५४ वा

मुंबई:  आपण सर्वजण एका गोष्टीची कटाक्षाने काळजी घेत असतो ती म्हणजे आपली जीवनातील गुणवत्ता सुधारत राहणे. जीवनाची गुणवत्ता कशावर आधारित असते याविषयी काही संशोधन झाले आहे आणि त्याच्या निष्कर्षाप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला‌ जीवनात आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहेत.त्या तीन विभागात मांडता येतील. प्राथमिक गरजा, सामाजिक गरजा आणि आध्यात्मिक गरजा. या सर्व गरजांची जास्तीत जास्त प्रमाणात पूर्तता, जास्तीत जास्त लोकांसाठी होते तेव्हा त्या देशाच्या जीवनाची गुणवत्ता पातळी खूप चांगली असते असे समजते.

यावर ठरते जीवनाची गुणवत्ता

प्राथमिक गरजा म्हणजे हवा, पाणी, अन्न, निवारा व सुरक्षा. त्यानंतर सामाजिक स्थैर्य, शांतता आणि आपल्या आवडीप्रमाणे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य. आध्यात्मिक म्हणजे आपल्या स्वत्वाचा आणि आपला विश्वातल्या अस्तित्वाच्या संबंधांचा शोध घेऊन जीवन परिपूर्णपणे जगणे.आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यासाठी पर्यावरणाची अनुकूलता आवश्यक आहे. त्यावरच जीवनाची गुणवत्ता अवलंबून आहे. सध्या आपल्या प्राथमिक गरजांकडे थोडे जास्त लक्ष केंद्रित करू.



पर्यावरणपूर्वक जीवनशैली

हवा, पाणी, ध्वनी, जमीन, आणि प्रकाश या सर्व प्रदूषणापासून मुक्त राहून आपल्या जीवनाची गुणवत्ता नक्कीच वाढवू शकतो. ती वाढवण्याची परिणामकारक युक्ती म्हणजे पर्यावरणपूर्वक जीवनशैली अंगीकारणे. चंगळवादी जीवनशैलीपासून कटाक्षाने दूर राहणे.

गुणवत्तेचे मोजमाप

जीवनाची गुणवत्ता मोजण्यासाठी Numbeo''s - Quality of life index या मोजमाप पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यामध्ये प्रदूषण व हवामान याबद्दलचे आणि इतर काही विभाग असतात आणि त्यावर प्रत्येक देशाच्या जीवनाच्या गुणवत्तेचे मोजमाप केले जाते.

भारताचा नंबर ५४ वा

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीप्रमाणे जगामध्ये नेदरलँड्स, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, फिनलंड, आइसलँड, ऑस्ट्रिया, ओमान, ऑस्ट्रेलिया आणि नॉर्वे हे दहा देश सर्वांत जास्त चांगली जीवनाची गुणवत्ता असलेले आहेत.८४ देशांच्या गुणवत्ता मोजण्यासाठी केलेल्या परीक्षणाप्रमाणे भारताचा नंबर ५४वा आहे. जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी भारताला जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणाची गुणवत्ता जपल्याशिवाय जीवनाची गुणवत्ता वाढवू शकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने