2024 ची तयारी सुरू! CM नितीशकुमार यांनी घेतली राहुल गांधीची भेट

बिहार: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि JD(U) अध्यक्ष लालन सिंह यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधनी आतापासूनच सुरुवात झाली आहे.याशिवाय विरोधी पक्षांना एकत्र करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार यांनी बुधवारी दुपारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.



नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते. विशेष म्हणजे खर्गे यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी समविचारी पक्षांमध्ये एकोपा अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा करत आहेत.खर्गे यांनी नुकतीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट झाली होती. तर काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी अनेक नेते बैठका घेत आहेत. मागील महिन्यात नितीश कुमार म्हणाले होते की, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 2024 ची लोकसभा निवडणूक एकजुटीने लढवली.तर भाजपच्या जागा 100 पेक्षा कमी होतील. शरद पवार, अरविंद केजरीवाल, डी राजा, सीताराम येचुरी आणि अखिलेश यादव यांसारख्या नेत्यांना भेटल्यावर नितीश कुमार यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीला भेट दिली होती. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष सत्ताधारी आघाडीचा भाग आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने