शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या भेटी मागील कारण आलं समोर; लवकरच...

मुंबई: महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली अचानक झालेल्या भेटीमुळे राजकारणात काही घडणार का अशा चर्चा पाहिला मिळाल्या मात्र भेटी मागील कारण समजू शकलं नव्हतं.मात्र आज खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी झालेल्या ठाकरे-पवार भेटी मागील कारण सांगितलं आहे. आज पत्रकार परिषदमध्ये बोलत असताना म्हणाले, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रदीर्घ अशी महत्त्वाची बैठक पार पडली.



या बैठकीमध्ये राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. भविष्यातील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली, शरद पवार देशाचे जेष्ठ नेते आहेत. या बैठकीत सुप्रिया सुळे देखील होत्या, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.दरम्यान राऊतांच्या या माहितीमुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची मुठ बाधण्यासाठी आता उद्धव ठाकरे देखील पुढाकार घेणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी नंतर भाजपमध्ये घडामोडींना वेग आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. या संपूर्ण घडामोडीसह राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा चंद्रशेखर बावणकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शाह यांना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने