मुस्लीम धर्मात रोजा का ठेवला जातो, रोजा ठेवण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली?

मुंबई: यंदा वर्षातील रमजानला २४ मार्च सुरुवात झाली असून मुस्लीन बंधु-भगिणींनी त्यांचा पहिला रोजा या दिवशी ठेवला. रोज्यादरम्यान सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत काहीच खाता येत नाही. यादरम्यान पाणीसुद्धा प्यायचं नसतं. मुस्लीम धर्मात रमजानची सुरुवात दुसऱ्या हिजरीपासून झाली. चौदाशे वर्षानंतरही ही परंपरा अजून कायम आहे.रमजानच्या पवित्र महिन्या मुस्लीम लोक रोजा ठेवतात. तसेच या काळात अनेक पुण्यकर्म करतात.



रोजा मुस्लीम कॅलेंडरच्या नवव्या महिन्यात का ठेवला जातो ?

जमात-ए-इस्लामी हिंदच्या सरिया काउंसिलचे मौलाना रजियुल इस्लाम यांनी आज तक माध्यमांशी बोलताना त्यांना सांगितले की, रमजान अरबी शब्द असून हा मुस्लीम महिना आहे. हा महिना रोज्यासाठी खास बनवण्यात आला आहे. रोज्याला अरबी भाषेत 'सौम' म्हटले जाते. सौमचा अर्थ होतो थांबणे, म्हणजेच स्वत:वर नियंत्रण ठेवणे.तर दुसरीकडे फारसीमधे उपवासाला रोजा म्हणतात. भारतीय मुस्लीम समुदायावर फारसी भाषेचा जास्त प्रभाव असल्याने तेसुद्धा या उपवासांना रोजा असं म्हणतात. रमजानची सुरुवात चंद्र बघितल्यानंतर होते.रोजा हा मुस्लीम धर्माच्या पाच मुलभूत सिद्धांतापैकी एक आहे. जो सगळ्या मुस्लीम समुदायासाठी फार महत्वाचा मानला जातो. यातील पहिला सिद्धांत तौहीद म्हणजेच कलमा, दुसरा नमाज, तीसरा जकात, चौथा रोजा आणि पाचवा हजला जाणे, असे एकूण मुस्लीम समुदायाचे पाच सिद्धांत आहेत.

मुस्लीम धर्मात रोज ठेवण्याची परंपरा कधी सुरु झाली?

मौलाना रजियुल इस्लाम नदवी इस्लामी यांच्या मते, इस्लाम धर्मात रोज ठेवण्याची परंपरा दुसऱ्या हिजरीमधे सुरु झाली. कुराणची दुसरी आयात 'सूरह अल बकरा' मधे असे स्पष्ट म्हटले आहे की, रोजा हा तेवढाच महत्वाचा आहे जेवढा उपवास महत्वाचा असतो. मोहम्मद साहेब मक्क्याचा प्रवास करून मदिन्याला पोहोचल्याच्या एक महिन्यानंतर मुस्लीम समुदायाला रोजा ठेवण्याचा आदेश देण्यात आला. अशाप्रकारे दुसऱ्या हिजरीनंतर मुस्लीम धर्मात रोजा ठेवण्याची परंपरा सुरु झाली. तर जगात अनेक धर्मांमधे रोजा ठेवण्याची त्यांची स्वत:ची एक वेगळी परंपरा आहे.

मुस्लीम धर्मात या लोकांना रोज न ठेवण्याची सूट

मौलाना मिस्बाही सांगतात की, मुस्लीम धर्म मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी रोजा हा बंधनकारक आहे. मात्र ज्यांची प्रकृती बरी नाही किंवा जे हज यात्रेवर आहेत त्यांना रोजा करण्यापासून सूट देण्यात येते. तसेच ज्या महिला गर्भवती आहेत किंवा ज्यांना मासिक पाळी आली असेल त्यांना रोजा करण्यापासून सूट देण्यात येते. मात्र सुटलेले रोजे तेवढेच त्यांना नंतर करावे लागतात. रोज्याच्या काळात औषधे घेण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. मात्र तुम्ही सहरी किंवा इफ्तारच्या वेळी औषध घेऊ शकता. 

मुस्लीम धर्मात रोज्याचे महत्व

डॉ. जीशान मिस्बाही सांगतात की, मुस्लीम धर्मात रमजानला फार महत्व आहे. या काळात अल्लाहची तुमच्यावर विशेष कृपा असते. रमजानचा महिना हा शांततेचा महिना मानला जातो. या काळात केलेल्या रोज्याचे आणि दानाचे फळ तुम्हाला अल्लाह देतो.

रमजानमधे दानाला विशेष महत्व

रमजानमधे जकात म्हणजे दानाला विशेष महत्व आहे. प्रत्येकाने त्यांच्या दानातील अडीच टक्के रक्कम दान करावी. तसेच प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने फितरा आवर्जून करावा. यामधे २ किलो ४५ ग्राम गहू गरीबांना दान केल्या जाते. तसेच या त्याच्या किमतीऐवढी रक्कमही त्यांना दिली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने