समृद्धी महामार्गावर मिळणार केवळ याच वाहनांना प्रवेश

मुंबई:  राज्यातील एक सर्वात वेगवान महामार्ग अशी ओळख असणारा समृद्धी महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला असला तरी यापुढे या मार्गावर कोणती वाहनं प्रवास करणार यासाठी काही नियम लागू केले आहेत. या महामार्गावर अपघातांना आळा घालण्यासाठी जे देखील वाहन यावर प्रवास करणार त्याची संपर्ण तपासणी आधी केली जाणार असून वाहन सुस्थितीत असेल तरच महामार्गावर प्रवेश दिला जाणार आहे.विविध जिल्ह्यातून जाणारा हा समृद्धी महामार्ग बुलढाण्यातून देखील जातो. दरम्यान तेथील सिंदखेड राजा टोल प्लाझावर आज सकाळपासून उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे .समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग आता ॲक्शन मोडमध्ये आला असून आता सिंदखेड राजा येथील टोल नाक्यावर समृद्धी महामार्गावर प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची आधी कसून तपासणी करण्यात येत आहे.



या तपासणीत वाहनांचे टायर्स , वाहनांची परिस्थिती , वाहनांचा आवाज , सीट बेल्ट इत्यादी बाबी तपासून जर सुस्थितीत वाहन असेल तरच समृद्धी महामार्गावर प्रवेश देण्यात येणार आहे . गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.मागील काही महिन्यात समृद्धी महामार्गावर जवळपास 17 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे . त्यामुळे आता वाहन तपासणी मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात टायर फुटून तर कुठे वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झालेले आहेत. म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने आता चालकांसाठीही समुपदेशन सुरू केलं आहे.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलं. त्यामुळे आता आरटीओ अर्थात परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये आला असून अनेक उपाययोजना करत आहे. यातीच एक उपायोजना हणून आरटीओ विभागाने आज संपूर्ण महामार्गावर वाहनांची तपासणी खासकरुन टायरची तपासणी, सीट बेल्ट लावण्याबद्दल जनजागृती अशा गोष्टी केल्या.तसंच नियम न पाळणाऱ्या वाहनांना समृद्धीवर प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं. दरम्यान अशा प्रकारचं अंमलबजावणी सत्र समृद्धी महामार्गावर राबवलं जात आहे. त्यामुळे आता यापुढे आपण समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याकरता निघत असल्यास सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.समृद्धी महामार्गावर वाहकांच्या निष्काळजीपणामुळे किंबहुना काळजी न घेता सुसाट वाहन चालवण्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत . त्याकरता फक्त वाहनांवर वेग नियंत्रित न करता वाहन चालकांना त्यांच्या मनावर देखील वाहन चालवताना ताबा ठेवणे तेवढेच गरजेचे झालं आहे. ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग आपल्याला मिळाला आहे, त्याचा तसाच योग्य वापर करणं गरजेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने