मोदी-ईडीला टॅग करत ५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत राऊतांची थेट सीबीआयकडे तक्रार

मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत सातत्याने सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसतात. याच संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारागृहात जावं लागलं होतं. त्या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर राऊत आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला टॅग करत सीबीआयकडे तक्रार केली आहे.



संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, सीबीआयकडेकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या 500 कोटींच्या घोटळ्याबाबत मी केलेलया तक्रारारीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने डोळेझाक केली. त्यामुळे मी आता सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघूया पुढे काय होते ते, असंही ते ट्विटमध्ये म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला टॅग केलं आहे. तसेच दोन पानाचं पत्रही शेअर केलं आहे.संजय राऊत यांनी याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५०० कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार केली होती. याबाबतच पत्र त्यांनी फडणवीसांना दिलं होतं. आपल्या तक्रारीत त्यांनी थेट राहुल कुल यांचं नाव घेतलं आहे. आता सीबीआय या प्रकरणी काय दखल घेतं हे पाहवं लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने