आता स्क्रॅप वाहनातूनही होणार कमाई

मुंबई: प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, हे लक्षात घेऊन वाहन स्क्रॅप पॉलिसी आणली आहे. तुमच्या जुन्या पेट्रोल कारने 15 वर्षे पूर्ण केली असतील किंवा डिझेल कारने 10 वर्षे पूर्ण केली असतील तर तुम्हाला तुमच्या गाड्या स्क्रॅप कराव्या लागतील.पण जर तुम्ही नवी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर सरकारची वाहन स्क्रॅप पॉलिसी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ही स्क्रॅप पॉलिसी काय आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल, याची माहिती घेऊ.

ही स्क्रॅप पॉलिसी काय आहे?

जुनी आणि अयोग्य वाहने स्क्रॅप मध्ये काढण्यासाठी सरकार सर्वसामान्यांना सुविधा देते, खाजगी आणि व्यावसायिक वाहन मालक या सरकारी धोरणाचा लाभ घेऊ शकतात. स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत तुम्ही जुन्या कार, दुचाकी, स्कूटर इत्यादी स्क्रॅप मध्ये देऊ शकता.यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. जर तुमच्या कारने 10 वर्षे (डिझेल) किंवा 15 वर्षे (पेट्रोल) पूर्ण केली असतील, तर तुम्ही या पॉलिसी अंतर्गत जुनी कार स्क्रॅप करून नवीन कार खरेदी करताना मोठ्या प्रमाणात बचत करू शकता.



तुम्हाला वाहन स्क्रॅप पॉलिसीचे हे 3 फायदे मिळतील

फायदा 1: तुम्ही तुमचे वाहन एखाद्या स्क्रॅपिंग सेंटरला स्क्रॅपसाठी दिल्यास, तुम्हाला नवीन वाहनाच्या एक्स-शोरूम किमतीच्या सुमारे 4 ते 6 टक्के रक्कम स्क्रॅप मूल्य म्हणून मिळेल.

दुसरा फायदा: दुसरा फायदा तुमच्या खिशाला थोडासा दिलासा देखील देऊ शकतो, कारण तुम्हाला नवीन वाहन खरेदीवर नोंदणी शुल्कात सूट, तसेच मोटार वाहन करात सवलत यांचाही लाभ मिळेल.

तिसरा फायदा: ऑटो कंपन्यांना स्क्रॅप धोरणांतर्गत विकल्या जाणार्‍या नवीन वाहनांवर ग्राहकांना 5 टक्के सूट द्यावी लागणार आहे.

यूपीमध्ये राहणाऱ्या लोकांना याचा खूप फायदा होईल.

गेल्या महिन्यात समोर आलेल्या एका अहवालात असं दिसून आलंय की उत्तरप्रदेशातील स्क्रॅप धोरणांतर्गत नवीन वाहनांवर (वैयक्तिक) 15 टक्के सवलत आणि व्यावसायिक वाहनांवर 10 टक्के सवलत आहे. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, स्क्रॅप धोरणांतर्गत सूट मिळण्याचे फायदे राज्यानुसार बदलू शकतात.

वाहन स्क्रॅप पॉलिसीसाठी अर्ज कसा करावा?

वाहन स्क्रॅप पॉलिसी म्हणजे काय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल हे आपण बघितलं, पण आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की या पॉलिसीसाठी अर्ज कसा करायचा?तर सर्वप्रथम, तुम्हाला नॅशनल सिंगल विंडो सिस्टमच्या https://www.nsws.gov.in/ पोर्टलवर जावं लागेल. तिथे तुम्हाला सरकारी योजना ऑप्शन मधील वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीवर टॅप करावे लागेल.यानंतर, तुम्हाला Apply for Scheme Related Approvals हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला विनंती केलेली माहिती भरावी लागेल आणि नंतर Add to Dashboard वर क्लिक करावे लागेल. यानंतर, स्टेट रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी एसआरएफ वर क्लिक करा आणि नंतर सबमिट बटण दाबा. यानंतर, आपण या वेबसाइटद्वारे आपल्या अर्जाची स्थिती देखील ट्रॅक करू शकता.

लाखो सरकारी वाहने जाणार भंगारमध्ये

1 एप्रिल 2023 पासून केंद्र आणि राज्य सरकारची 9 लाखांहून अधिक जुनी (15 वर्षांपेक्षा जुनी) वाहने देखील भंगार मध्ये जातील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने