बेपत्ता झालेले तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीत सापडले

दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल रॉय बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, रॉय दिल्लीत सापडले. त्यांनी स्वतः माध्यमांशी चर्चा केली. दिल्लीत असल्याची त्यांनी स्वतः माहिती दिली.रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी विमान दिल्लीला पोहोचलं पण वडिलांचा काही पत्ता नाही. माजी रेल्वे मंत्री असणाऱ्या मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु यांनी पीटीआयशी बोलताना याबाबत माहिती दिली होती.



सोमवारी रात्री उशिरापासून वडिलांची काही माहिती मिळालेली नाही, ते बेपत्ता आहेत. त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नाहीय. तृणमूल नेते मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा शुभ्रांशू यांच्यात रविवारी वाद झाल्याचंही म्हटलं जात आहे. पत्नीच्या निधनानंतर मुकुल रॉय यांना आरोग्याच्या समस्या आहेत.दरम्यान, काही वैयक्तिक कामासाठी नवी दिल्लीला पोहोचले आहेत. पण त्यांच्याकडे कोणताही विशिष्ट अजेंडा नव्हता. असही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.भाजपमधून दीड वर्षांपूर्वी मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यापासून फारसे सक्रीय दिसले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला लोकसभेत पश्चिम बंगालमधून १८ जागा जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता असं मानलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने