IPL मध्ये चोर सुसाट... खेळाडूंच्या बॅट्ससह महागड्या वस्तू चोरीला

मुंबई: आयपीलचे सत्र जोरात सुरू आहे. प्रेक्षक देखील आयपीलमधील सामन्यांचा आनंद घेत आहेत. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांच्या बॅट, पॅड, हातमोजे आणि शूज चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विदेशी खेळाडूंच्या बॅटचीही चोरी झाली असून, प्रत्येक बॅटची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सुमारे ६ फलंदाजांच्या १६ बॅट चोरीला गेल्या आहेत.



इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बेंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध सामना खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू दिल्लीला पोहोचले. त्यांच्या किट बॅग त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला. कॅप्टन डेव्हिड वॉर्नरच्या ३ बॅट्स, मिचेल मार्शच्या २ बॅट्स, फिल सॉल्टच्या ३ आणि यश धुलच्या ५ बॅट्स चोरीला गेल्या आहेत. याशिवाय कोणाचे पॅड, कोणाचे हातमोजे, कोणाचे शूज आणि क्रिकेटचे इतर साहित्य देखील गायब झाले आहेतमात्र, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सरावासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी त्यांच्या एजंटशी संपर्क साधला आणि त्यांच्या बॅट कंपन्यांना पुढील सामन्यापूर्वी काही बॅट पाठवण्याची विनंती केली. मात्र विदेशी खेळाडूंनालवकर बॅट मिळने कठीण आहे.

 मात्र विदेशी बॅट बनवणाऱ्या कंपन्याही भारतात आहेत, त्यामुळे त्यांना येथे बॅट मिळू शकतात, त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.इंडियन एक्सप्रेस दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “प्रत्येकाच्या किट बॅगमधून वस्तू गहाळ झाल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला.अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलीस आणि नंतर विमानतळ प्राधिकरणाकडे नेण्यात आले. याप्रकरणी तपास सुरू आहे.खेळाडू येण्यापूर्वी त्यांचे सामान त्यांच्या हॉटेलच्या खोलीबाहेर पोहोचवले जाते. याची खात्री करण्यासाठी आयपीएल संघ एका लॉजिस्टिक कंपनीला कामावर घेतात. मात्र यावेळी किट बॅगमधून बॅट चोरीला गेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने